Sharad Pawar vs Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : अजित पवारांसोबत गेलेले लोक दु:खी, आमच्याकडून जे झालं ते चुकीचं झालं असं सांगताहेत; शरद पवारांचा गौप्यस्फोट

आम्ही कुणीही भाजपबरोबर (BJP) जाणार नाही - शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

'अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक म्हणतात की, आमच्याकडून जे झाले ते चुकीचे झाले.'

सांगोला : भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपबरोबर (BJP) जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.

आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मतपरिवर्तनाचे प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जाणार नाही, असंही शरद पवार यांनी केलं.

गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी पवार येथे आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. ‘‘इंडिया आघाडीची ३१ रोजी मुंबईत प्राथमिक धोरण ठरविण्यासाठी बैठक आहे. एक सप्टेंबरला देशातील ४० पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. त्या बैठकीत काही मुद्द्यांवर निर्णय घेतला जाऊ शकतो; असेही पवार यांनी स्पष्ट केले.

सत्ता काढून घेणे हाच अजेंडा असेल

राहुल गांधी पुन्हा खासदार झाले. पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीत वादविवाद होतील का असा प्रश्न विचारला? तेव्हा शरद पवार म्हणाले की, ‘‘पदासाठी वाद होणार नाही. सद्यःस्थितीत ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्यांच्याकडून ती काढून घेणे गरजेचे आहे.’’

वडीलकीच्या नात्याने भेटलो

‘‘अजित पवार यांच्यासोबत झालेली बैठक ही अजिबात गुप्त नव्हती. परंतु, माध्यमांनी त्यावर विनाकारण चर्चा केली. अजित पवार माझा पुतण्या आहे. वडिलकीच्या नात्याने मी त्यांना भेटलो तर ही माध्यमांमधील चर्चा होऊ शकत नाही. या भेटीने माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

सोडून गेलेले दुःखी

शरद पवार म्हणाले, ‘‘अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक म्हणतात की, आमच्याकडून जे झाले ते चुकीचे झाले. काही उघडपणे बोलत नाहीत. पण त्यांचे दु:ख माझ्यापर्यंत आलेले आहे,’’ असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT