ncp sharad pawar visit solapur to strengthen political party Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? मोदी बागेत बैठकींचं सत्र सुरु

यासंदर्भात पुण्यातील पवारांचं निवासस्थान मोदी बागेत यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात पुण्यातील पवारांचं निवासस्थान मोदी बागेत यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदारही उपस्थित असणार आहेत. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (sharad pawar faction may be merged in congress meeting at pawar residence modi baug in pune)

'हे' नेते बैठकीला होते उपस्थित

उद्या राज्यसभेच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याचा शेटवचा दिवस आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते आहे. पण काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत चाचपणी सुरु आहे. त्यासाठी खासदार आणि आमदारांची मत शरद पवार जाणून घेणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, आमदार अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, राजेश टोपे हे देखील उपस्थित आहेत. पण जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे मात्र अनुपस्थित आहेत. (Latest Marathi News)

बांदल यांचं मोठं विधान

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सुतोवाच केले आहेत. सध्या महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकीय स्थित्यंतर सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात वेगानं घडामोडी घडत आहेत याविषयी चर्चा सुरु आहेत.

उमेदवारी चाचपणी आणि पक्षाची नीती ठरवण्याचं काम सुरु आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतचा विषय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. पण चर्चा सुरु आहे, याबाबत लवकरच कळेल आपल्याला असं बांदल यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

शरद पवार गटाकडून अद्याप तरी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. उलट निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारच्या चर्चा करण्यात अर्थ नाही, असं शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण म्हणाल्या, "चर्चांना लगेच उधाण येतं अशा चर्चा न करता आपण जरा धीरानं घेतलं पाहिजे. (Latest Marathi News)

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळं महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं, एकमेकांशी संवाद करणं झालं तर लगेच राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना काही अर्थ नसतो. याबाबत सविस्तर माहिती चर्चेनंतर सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा जयंत पाटील स्वतः देतील. त्यामुळं याविषयी चर्चा करुन काहीतरी वेगळ्या दिशेनं आपण जायचं मला बरोबर वाटत नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT