Sharad Pawar Fears Manipur Like Situation In Maharashtra Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: " महाराष्ट्रातही निर्माण झाली असती मणिपूरसारखी परिस्थिती पण.. ", शरद पवारांनी सांगितलं कारण

Manipur Like Situation In Maharashtra: यावेळी पवारांनी मणिपूरमधील घटनांवर भर दिला, सध्या तिथे एकेकाळी एकत्र राहणारा कुकी-मेतेई समुदाय आता एकमेकांविरोधात हिंसाचार करत आहे.

आशुतोष मसगौंडे

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी एक मोठी भीती व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित सामाजिक एकता परिषदेच्या निमित्ताने शरद पवार यांनी मणिपूरमधील घटनांप्रमाणे महाराष्ट्रात अशांततेची भीती व्यक्त केली आहे. पण त्यांनी पुढे असेही सांगितले की, राज्याच्या समृद्ध परंपरेमुळे अशा घटनांना महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही.

यावेळी त्यांनी मणिपूरमधील घटनांवर भर दिला, सध्या तिथे एकेकाळी एकत्र राहणारा कुकी-मेतेई समुदाय आता एकमेकांविरोधात हिंसाचार करत आहे.

अनेक महिन्यांपासून दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरू असलेल्या मणिपूरमधील परिस्थितीचे गांभीर्य सांगून शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "मणिपूरमधील हिंसाचारामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली, महिलांना त्रासाला सामोरे जावे लागले तर शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले." त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, "एकेकाळी मणिपूरमध्ये जिथे दोन समुदाय एकत्र राहत होते, आता ते एकमेकांशी बोलायलाही तयार नाहीत."

महाराष्ट्राबद्दल भीती

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणाले, आज जे काही घडलं त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना तिथे जाऊन जनतेला दिलासा द्यावा, असं कधीच वाटलं नाही. हा प्रकार मणिपूरमध्ये घडला. शेजारील राज्यांमध्येही असेच घडले. कर्नाटकातही तेच दिसून आले आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही असेच घडण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, महाराष्ट्राला समरसतेची आणि समतेची दिशा देणाऱ्या अनेक दिग्गजांचा वारसा आहे. त्यामुळे अशा घटनांना राज्यात स्थान मिळणार नाही.

दरम्यान महाराष्ट्रातही गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहे. मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी आहे. अशात मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश झाल्यास ओबीसींवर अन्याय होईल असा दावा करत ओबीसी नेते या मागणीला विरोध करत आहे. त्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये कटूता निर्माण झाल्यासरखी परिस्थिती होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT