Sharad Pawar and ajit pawar  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : अजित पवारांबाबतच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवार संतापले; म्हणाले, आशीर्वाद...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडानंतर शरद पवार संपूर्ण राज्यात दौरा करणार आहेत. आज शरद पवार यांनी अजित पवारांबाबत विधान केले. यावेळी अजित पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.

अमोल कोल्हे परत येतो, असं म्हणत असतील, तर चांगलं आहे. माझी मुलगी तीनवेळा अजित पवारांना भेटली तर त्यात काही चुकीचं नाही. एकत्र काम केलेलं आहे. यावेळी पवारांना विचारण्यात आलं की, अजित पवार म्हणाले की, पक्ष माझ्यासोबत आहे. वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे. त्यावर तुमची काय भूमिका आहे.

यावर पवार म्हणाले की, आम्ही कोणावर अपात्रतेची कारवाई करणार नाही. मात्र तुमच्यासारखे क्षुद्र बुद्धीचे लोक असतील तेच त्याला आशीर्वाद म्हणतील. ज्यांना एवढं समजत नाही, मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी निघालोय पक्षाच्या बांधणीसाठी. त्यावेळी पत्रकार परिषदेत आशीर्वाद हा शब्द वापरून पत्रकारितेचा दर्जा तुम्ही खराब करू नका, ही तुम्हाला विनंती, असं पवार म्हणाले.

दरम्यान पक्षाचं नेतृत्व जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. ते विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आहे. त्यांनी एखादा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय केलं मला माहित नाही. ते जो निर्णय घेतील तो विचारपूर्वकच घेतील, असंही पवार म्हणाले. शिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो. आम्हाला त्यात चूक झाल्याचं वाटत नाही, असंही पवार म्ङणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडिया आघाडीच्या एकजुटीने मोदी सरकारची उडाली झोप, मोदी-शहांना आता विरोधकांत फुटीची आशा

Chhatrapati Samabhajinagar: साजापूर भंगार गोदामात भीषण आग; दोन गोडाऊन खाक; लाखो रुपयांचे नुकसान; सुदैवाने कोणीही जखमी नाही

Latest Marathi News Live Update: नाशिक धर्मांतर प्रकरणी सोशल मीडिया ग्रुप्स पोलिसांच्या रडारवर

Nanded News: बुडून चार मुलांचा जीव गेला; खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरले होते पोहायला

Kolhapur Friend kills friend : कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगार लाल्याचा चोकाकमध्ये पुलाखाली खून, मित्रानेच मित्राचा काढला काटा

SCROLL FOR NEXT