Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Rajya Sabha Election : शरद पवार गटामुळे राज्यसभा निवडणुकीचे गणित बदलले

शरद पवार यांच्या गटात निश्चितपणे दहा आमदार आहेत. त्यांच्या वेगळ्या गटाला आयोगाने मान्यता दिली आहे.

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार दाखल करण्याच्या विचारात असताना निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या आमदारांचे वेगळे अस्तित्व मान्य केल्याने समीकरणे कठीण झाली आहेत.

शरद पवार यांच्या गटात निश्चितपणे दहा आमदार आहेत. त्यांच्या वेगळ्या गटाला आयोगाने मान्यता दिली आहे. आता या दहा आमदारांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ या गटाचा आदेश मान्य करावा लागणार आहे. शिवसेनेबाबत उद्धव ठाकरे यांच्या गटाला अशी मान्यता दिली नव्हती. त्यामुळे दोन्ही गटांना भरत गोगावले यांचा ‘व्हीप’ पाळावा लागेल.

काँग्रेसकडील ४४ मते आणि शरद पवार गटाच्या दहा आमदारांची भर पडून त्यांचा राज्यसभेतील उमेदवार भाजप पाडू शकणार नाही, असे विरोधी पक्षाचे गणित आहे. या दहा मतांची रसद मिळाली नसती तर काँग्रेसमधील काही मते घेण्याची खेळी आखली जाणे शक्य होते, असे भाजपमधील काही धुरीण मानत होते.

उमेदवार निवडून येण्यासाठी ४१ मतांचा कोटा लक्षात घेतला तर पहिल्याच फेरीत ५४ मते एकाच उमेदवाराला देऊन जागा सुरक्षित करता येईल. आयोगाने शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले नसते तर ‘व्हीप’चा बडगा अन काँग्रेसमधील सात ते आठ मतांची संभाव्य बेगमी लक्षात घेता सर्व जागा सत्तारूढ आघाडीला जिंकणे अशक्य नव्हते.

शरद पवार गटासमवेत १५ आमदार असून त्यातील पाच आमदारांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत प्रतिज्ञापत्रे दिली आहेत. दहा आमदार निश्चितपणे विरोधी बाकांवर आहेत.

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष

निवडणूक आयोगाने कोणताही निकाल दिला असला तरी अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचा ‘व्हीप’ पाळावाच लागेल, असा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देऊ शकतात, असे एका घटनातज्ज्ञाने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT