NCP Crisis 
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: शरद पवार गटाने EC मध्ये संपूर्ण इतिहास सांगितला! मात्र अजित पवार गटाकडे दोन पॉवरफुल मुद्दे

Sandip Kapde

NCP Crisis: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद आता निवडणूक आयोगात रंगला आहे. आज निवडणूक आयोगात सुनावणी संपली असून पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे. शरद पवार यांच्या गटाकडून देवदत्त कामत यांनी आज युक्तीवाद केला. शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे कामत यांनी आयोगत सांगितले. यानंतर अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुकुल रोहतगी म्हणाले, "शरद पवार गट काही न पाहता बोलत आहे. ४० पेक्षा जास्त आमदार त्यांच्यासोबत नाहीत. त्यांच्याकडे बहुमत नाही. ते जुने वक्तव्य करत आहेत की शरद पवार २० वर्षापासून पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि तेच राहतील. त्यांचा एकमात्र हेतू हे प्रकरण लांबवणे आहे. पुढील सुनावणी बुधवारी (२९ नोव्हेंबर) होणार आहे."

शरद पवार गटाने आज १९९९ पासून संपूर्ण इतिहास निवडणूक आयोगात मांडला. मात्र अजित पवार गट दोन मुद्दावर ठाम आहे. ते म्हणजे ४० आमदारांचा पाठींबा आणि बहुमत. अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी देखील हा मुद्दा लावून धरा आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी म्हणाले, देवदत्त कामत यांनी सांगितले की विचित्र घटना घडत आहेत. १९९९ पासून एक पक्ष निर्माण केला, विस्तार झाला तो फक्त शरद पवार यांच्यामुळे. यांना सर्वांना सहमतीने अध्यक्ष स्विकारले. कधीही कोणताही आरोप २० वर्षात झाला नाही. मात्र आता वाद निर्माण करता येत नाही.

मनु सिंघवी यांनी अनुच्छेद १५ दाखला देत निवडणूक आयोगावर देखील प्रश्न उपस्थित केले.  अनुच्छेद १५ पक्षात आधीपासून वाद पाहीजेत. वेळेवर वाद निर्माण करुन याचिका दाखल करता येत नाही. तसेच निवडणूक आयोगाला कार्यवाही करता येत नाही, असे मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT