Sharad Pawar On PM Modi Offer Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar On PM Modi Offer: PM मोदींच्या सोबत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, 'PM मोदींमुळे....'

Sharad Pawar On PM Modi Offer: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना सोबत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासोबत मी कधीच जाणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमधील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केलं होतं. यावरुन पंतप्रधान मोदी यांनी समाचार घेतला. बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत पडले आहेत. त्यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावं असं ते म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना सोबत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासोबत मी कधीच जाणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे

'आज पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतीय संसदीय लोकशाही धोक्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. केंद्र सरकारचा याला पाठबळ असल्याशिवाय अशी गोष्ट होऊ शकत नाही. केंद्राचा हात असल्याशिवाय असं होऊ शकत नाही. ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासोबत राजकीय असो वा कसलंही सहकार्य होऊ शकत नाही,' अशा शब्दात पवारांनी मोदींनी दिलेल्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, जे देशाच्या हिताचं नाही त्यात माझं सहकार्य असणार नाही. तर अशा विधानांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थता दिसून येते असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.

तर आम्हाला नकली म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवाल देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संसदीय लोकशाही संकटात आहे. त्याचबरोबर आमची विचारधारा ही नेहरू आणि गांधी यांच्या विचाराची आहे असंही शरद पवारांनी पुढे म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT