महाराष्ट्र बातम्या

मोदींच्या मदतीला पवार! 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राफेल विमानांच्या खरेदीवरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना "चोर' असे म्हटलेले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या मदतीसाठी धावून आले आहेत. नरेंद्र मोदींच्या हेतूबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका नाही, असे वक्‍तव्य करून पवार यांनी मोदीविरोधी वातावरण शांत करण्यास मदत केल्याचे बोलले जाते. पवार यांनी एकप्रकारे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केल्याचे मानले जाते. विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची विरोधकांची मागणीही योग्य नाही, असे मतही त्यांनी खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. शेवटी राफेलच्या किमतीबाबत मात्र सरकारने माहिती दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. 

राफेलवरून कॉंग्रेस सध्या अत्यंत आक्रमक भूमिकेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौकीदार नाही, तर चोर आहेत. देशाला त्यांनी धोका दिला आहे. फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनीही मोदींना चोर म्हटले आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. 

सोशल मीडियावरून #CorruptModi आणि #PMChorHai अशी कॅम्पेनही चालवली जात आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात नरेंद्र मोदींच्या हेतूबद्दल अजूनही संशय नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केल्याने याकडे लक्ष वेधले जात आहे. 

बोफर्स प्रकरणावरून त्याकाळी भाजपने रान पेटवले होते. भाजपने त्या वेळी केलेली संसदीय चौकशी समितीची मागणीही कॉंग्रेसने मान्य केली होती. असे असताना त्याकाळात विरोधी पक्षात असणारे आज सत्तेत आहेत. त्यांनी राफेलच्या जेपीसीची मागणी मान्य करावी, असे पवार या वेळी म्हणाले. पवार यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसचे नेते कोणती प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे डोळे लागले आहेत. 

विमानाच्या तांत्रिक गोष्टींची माहिती उघड करणे ही विरोधी पक्षांची मागणी योग्य नाही. विरोधकांची दुसरी मागणी मात्र योग्य असून, विमानाच्या किमतीबाबतची माहिती सरकारने जाहीर केली पाहिजे. 
- शरद पवार,  अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT