ajit pawar ncp Praful Patel sakal
महाराष्ट्र बातम्या

''भंडाऱ्यात शरद पवारांच्या स्वागतासाठी मी जाणार, कार्यकर्त्यांनी सभेसाठी गर्दी करावी'' प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे आश्चर्य

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पक्षात फूट पडली. त्यांच्याकडे पक्षातला मोठा गट असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर शरद पवारांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. याचदरम्यान शरद पवारांना सोडून सत्तापक्षात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या.

शरद पवारांनी राज्यभरात स्वाभिमान दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात पहिली सभा येवल्यात झाली होती. दुसरी सभा बीडमध्ये झाली तर उद्या तिसरी सभा कोल्हापुरात होत आहे. पवारांची भंडाऱ्यातदेखील सभा होऊ शकते. प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात सभा झाली तर स्वतः प्रफुल्ल पटेल पवारांच्या स्वागताला जाणार आहेत.

पक्षात बंड झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल काल पहिल्यांदा भंडारा जिल्ह्यामध्ये पोहोचले. त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवारांची भंडाऱ्यात सभा असल्यानंतर त्या सभेला गर्दी झाली पाहिजे, कार्यकर्त्यांनी आवर्जून सभेला जावं, असं आवाहन त्यांनी केलं. त्यांच्या विधानाने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रफुल्ल पटले पुढे म्हणाले की, शरद पवार हे जिल्ह्यात आले तर त्यांच्या स्वागतासाठी मी जाणार आहे. तुम्हीही या, आपण मिळून जावू आणि त्यांचं स्वागत करु. साहेबांच्या सभेसाठी आपल्याशिवाय कुणीही गर्दी करु शकत नाही आणि भाषणामध्ये माझ्याविरोधात बोलले तरी ऐकून घेऊ, असा टोमणा त्यांनी मारला.

प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे नेते समजले जातात. शरद पवारांच्या सर्वच निष्ठावान आणि जुन्या नेत्यांनी भाजपशी घरोबा केला. त्यामुळे या बंडाविषयीच शंका उपस्थित केल्या जात आहे. तरीही शरद पवार ताकदीने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. त्यातच प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी उपरोधिकपणे टिपण्णी केल्याचं समजतं. 'टीव्ही ९ मराठी'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT