महाराष्ट्र

खासगी विमानाने शरद पवार कोल्हापुरात; एनडी पाटील यांच्याबद्दल म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती कारणाने त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या वर्षी त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशी भावना सर्वच स्तरातून उमटत आहे. त्यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार खासगी विमान पुण्याहून कोल्हापूरला गेले होते.

त्या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या हिताचं जपणूक करणारा, जुन्या पिढीतल्या एका माणसाला आपण गमावलं आहे. एनडी पाटील यांची विचारधारा ही डावी होती. आणि त्या विचारसरणीच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं. व्यक्तिगत सुख घरदार याचा कधी विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्या दृष्टीने अंतिम होता. आणि एका बाजूने डाव्या विचारासंबंधी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूने उपेक्षित समाजातल्या घटकांचा कल्याणासाठी, शिक्षणासाठी जे दरवाजे खुले केले त्यामध्ये पूर्णपणाने कर्मवीरांचा विचार पुढे नेण्यासाठी आयुष्य घालवलं. राजकारणामध्ये आम्ही वेगवेगळ्या दिशेने होतो. ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक होते. आम्ही लोक गांधी-नेहरुंच्या विचारांनी पुढे जाणारे लोक होतो. त्यांच्याशी वेळप्रसंगी मतभेदही व्हायचे. पण ते मतभेद एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊ द्यायचे नाहीत, याचं पथ्य त्यांनी प्रकर्षाने पाळलं होतं.

पुढे ते म्हणाले की, पण रयत शिक्षण संस्थेमध्ये ते अध्यक्ष आणि मी चेअरमन.. त्या काळात झोकून देऊन काम केलं. कर्मवीरांचा, शाहू-फुलेंच्या विचारांचं काम अखंडपणाने केलं. संघर्षामध्ये त्यांनी अपयश घेतलं नाही. दुर्दैवाने वय जास्त झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही त्यांनी दोन तीन वेळा मात केली. मात्र, यावेळी हा योद्धा शेवटच्या संघर्षामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच आज ते आपल्यामध्ये नाहीयेत. आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने हे दु:ख कौटुंबिक आहेच. पण त्यापेक्षा सामान्य लोकांच्या, कष्टकऱ्यांच्या दृष्टीने त्यांचं जाणं हा फार मोठा आघात आहे. मला विश्वास आहे, की महाराष्ट्रातील नवीन पिढी त्यांचा आदर्श समोर ठेवेल आणि सामान्यांच्या हितासाठी त्यांनी जो रस्ता दाखवला त्या रस्ताने जायचा प्रयत्न करतील, त्यामध्ये जेवढं यश मिळेल तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

Venkatesh Iyer: शुभमंगल सावधान! IPL संपताच KKR चा स्टार ऑलराऊंडर अडकला चढला बोहल्यावर, फोटो व्हायरल

Top Youtuber : 'मिस्टर बीस्ट'ने टी-सीरिजला मागे टाकत रचला सबस्क्राइबर्सचा इतिहास; MrBeast विरुद्ध T-Seriesची स्टोरी माहितीये काय?

Pune Porsche Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अग्रवाल पती-पत्नीस ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल आज तिहार जेलमध्ये जाऊन आत्मसमर्पण करतील- आतिषी

SCROLL FOR NEXT