Sharad Pawar is not racist raju Shetti satara sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार जातीयवादी नाहीत : राजू शेट्टी

‘‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगाव देवराष्ट्रेपासून बळिराजा उद्धार यात्रा सुरू

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो. त्यांचे राजकारणही बघतो. त्यांचे आमचे वैचारिक मतभेद आहेत. मात्र, एवढ्या दीर्घ काळात त्यांनी कधीही जातीयवादी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ते जातीवादी नाहीत, असे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज येथे दिले. बळिराजा उद्धार यात्रेनिमित्त शेट्टी कऱ्हाडला आले होते. त्याचदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेट्टी म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगाव देवराष्ट्रेपासून बळिराजा उद्धार यात्रा सुरू झाली आहे.

एक मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी, शेतकऱ्यांना हमीभावाचा गॅरंटी कायदा केंद्र सरकारने मंजूर करावा हे दोन ठराव करण्यात येणार आहेत. ते ठराव घेऊन आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्याचबरोबर आम्ही हे ठराव राष्ट्रपतींना देणार आहोत.

म्हणून वाजताहेत राजकीय भोंगे...

महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरले आहे. दोन वर्षांत महापूर, कोरोनासह अनेक आपत्ती आल्या. त्यामध्ये पीक विमा योजना राबविणाऱ्या कंपन्या कर्जबाजारी होऊन दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या. मात्र, त्याच कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा कमविला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारचे अपयश यावर चर्चा नको म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असेही शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT