Sharad Pawar Replied Raj Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

...त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतंय, पवारांचा राज ठाकरेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज ठाकरेंनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यालाच आता पवारांनी प्रत्युत्तर (Sharad Pawar Replied Raj Thackeray Allegations) दिले आहे. मी महाराजांबद्दल काय काय बोललोय? हे ऐकावं. ते वृत्तपत्रात वाचावं. पण, त्यासाठी सकाळी लवकर झोपेतून उठावं लागतंय, असा टोला पवारांनी राज ठाकरेंना लगावला.

एखादी व्यक्ती सहा महिन्यात मत व्यक्त करते ते गांभीर्यानं घेण्यासारखं नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, असा उल्लेख राज ठाकरेंनी केला. दोन दिवसांपूर्वी मी अमरावतीला होतो. तुमचे कोणी सहकारी असतील तर त्यांच्याकडून माझं शिवाजी महाराजांच्या योगदानावर केलेलं भाषण मागवून घ्या. मला सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचायची सवय आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. अनेकजण वृत्तपत्रात काय लिहिलंय हे न वाचता वक्तव्य करत असेल तर मी त्यांना दोष देणार नाही, असा टोला शरद पवारांनी राज ठाकरेंना लगावला.

महात्मा फुलेंनी शिवछत्रपतींबाबत काव्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा लिहिलंय. शाहू-फुले-आंबेडकर तिघेही महाराजारांच्या विचारावर चालतात. म्हणून मला या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे छत्रपतींच्या विचारांची मांडणी कऱण्यासारखे महत्वाचे वाटते. मी शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, हा आरोप खोटा आहे. कालच्या भाषणात सर्वसामान्यांचा एकही प्रश्न नाही. राष्ट्रवादीमध्ये विविध जातीच्या लोक आहेत. महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण, लोकांनी त्याकडे लक्ष देऊ नये, असंही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT