anil deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

Next CM of Maharashtra: ना फडणवीस, ना शिंदे; मुख्यमंत्री होणार तर फक्त...; अनिल देशमुखांचा मोठा दावा

कार्तिक पुजारी

Next CM of Maharashtra

मुंबई- पुढील वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांचं नाव घेतात, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं ठामपणे सांगतात. पण, शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी वेगळा दावा केला.

महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले की, 'शिंदे गटाचे आमदार म्हणतात की 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार तर भाजपाचे आमदार म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, परंतु 2024 मध्ये ना फडणवीस ना शिंदे फक्त राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार!'

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न आहे. येत्या काळात शिंदे गट, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. पण, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून आघाडी तयारी केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले. त्यांनी भाजपसोबत घरोबा केला. तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे येत्या काळात कोण मुख्यमंत्री होतं हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT