Kalavati Bandurkar Issue : अमित शाह लोकसभेत खोटं बोलले, हा मोठा चिंतेचा विषय! भाजपला नेत्याचा घरचा आहेर

bacchu kadu on Amit Shah lying in Lok Sabha about kalavati bandurkar rahul gandhi Parliament Monsoon session 2023
bacchu kadu on Amit Shah lying in Lok Sabha about kalavati bandurkar rahul gandhi Parliament Monsoon session 2023

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या देशात गोंधळ सुरु आहे. २००८ मध्ये राहुल गांधी भेटलेल्या कलावती बांदूरकर नावाच्या महिलेबद्दल अमित शाह खोटे बोलल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यानंतर भाजपला या प्रकरणी घराचा आहेर मिळाल्याचे पाहयला मिळत आहे.

कलावती यांच्या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत खोटं बोलले अशी प्रतिक्रिया एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी दिली आहे. अमित शाह यांनी खोटं बोलणं चिंतेचा विषय असून यामुळे भाजपचंच नुकसान होणार असल्याचे देखील कडू म्हणाले आहेत.

bacchu kadu on Amit Shah lying in Lok Sabha about kalavati bandurkar rahul gandhi Parliament Monsoon session 2023
MPSC Exam Fees News : रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी, अजितदादांनी केली पूर्ण; दिल्या महत्वाच्या सूचना

काल संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केल्याचा दावा केला होता. मात्र कलावती यांच्याकडून अमित शाह यांचा दावा फेटाळण्यात आला. आपल्याला भाजपकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. यानंतर बच्चू कडू यांनी आज प्रतिक्रिया दिली.

bacchu kadu on Amit Shah lying in Lok Sabha about kalavati bandurkar rahul gandhi Parliament Monsoon session 2023
Maharashtra Politics : झेंडावंदनाच्या यादीवरून राष्ट्रवादीचे मंत्री नाराज, अजित पवार कोल्हापूरला जाणार नाहीत?

अमित शाह यांनी वेगळीच स्टोरी बनवली आहे. त्यांनी उत्तराखंडमधील कुठलंतरी गावाचं नावं घेतलं. तेथे कलावतीच नाहीये, ती महाराष्ट्रात आहे. अमित शाह यांन मुद्दा उचलला पण तो तेवढ्याच जोरात आपटला. म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला असा तो प्रकार झाला.

कलावती बांदूरकर सांगत आहेत की, काँग्रेसने मदत केली आणि अमित शाह म्हणत आहेत की आम्ही मदत केली. एवढ्या लहान मुद्द्यावर त्यांनी (अमित शाह) लोकसभेत बोलावं आणि तेही खोटं बोलावं हा मोठा चिंतेचा विषय आहे, असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com