Sharad Pawar On Maratha Reservation Maharashtra Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation बाबत सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला

Sharad Pawar On Maratha Reservation: आता अशात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण कसे मिळू शकते याबाबत उपाय सांगितला आहे.

आशुतोष मसगौंडे

राज्यात गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे.

आता अशात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण कसे मिळू शकते याबाबत उपाय सांगितला आहे.

सांगलीमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा. जर केंद्राने हा निर्णय घेतला तर त्याला आमचा पाठिंबा असेल. तामीळनाडूत आरक्षण 78 टक्क्यांपर्यंत नेलं जातं तर महाराष्ट्रात का नाही? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे (SP) अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "आरक्षण दिले पाहिजे, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यात काही गैर नाही. मात्र हे करत असताना इतरांना मिळणारे आरक्षणही जपले गेले पाहिजे, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये. आरक्षणाच्या सध्याच्या पद्धतीनुसार 50% च्या वर आरक्षण देता येत नाही आणि जर आरक्षण 50% च्या वर घ्यायचे असेल तर माझ्या मते कायदा बदलावा लागेल."

जागावाटप

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवार म्हणाले, "मी जागावाटपाच्या चर्चेत सहभागी नाही, त्यामुळे या विषयावर मी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. जयंत पाटील हे आमच्यावतीने उपस्थित असतात. या विषयावर ते बोलतील."

पवार पुढे म्हणाले, "लोकसभेच्या जागावाटपावेळी नाना पटोले आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यात कोणतेही मतभेद झाले नाही. महाविकास आघाडीतील संघर्ष फक्त एकाच ठिकाणी झाला तो म्हणजे सांगलीबाबत, सांगलीशिवाय कोणत्याही मतदारसंघात अशी घटना घडली नाही."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CJI DY चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेसाठी भेट दिल्यावर विरोधकांनी त्यावर टीका केली होती. याबाबत बोलताना पवार म्हणाले, "मला या विषयावर बोलायला आवडणार नाही. सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे सर्वोच्च पदावर आहेत. त्यामुळे या पदांची प्रतिष्ठा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Shrigonda Drowning: पोहताना वडिलाचा मृत्यू,९ वर्षीय मुलगा बचावला; श्रीगोंदे तालुक्यातील घटना, युवकाने जीव धाेक्यात घातला,थरारक घटना!

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

SCROLL FOR NEXT