Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी नाही"; आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन!

Sandip Kapde

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात बैठक घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर थेट टीका करणे टाळले. युवा नेत्यांना बळ देऊ शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

"पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची काळजी करण्यापेक्षा आपण नागरिकांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवले पाहिजेत. जर आम्ही आमच्या युवा नेत्यांना बळ देऊ शकलो, तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल. त्यामुळे आपण कामाला लागावे आणि आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मला खात्री आहे की आपण हे करू शकलो तर, आम्ही तरुण नेते उदयास येताना पाहणार आहोत," असे शरद पवार म्हणाले.

आगामी निवडणुकीत पवार विरुद्ध पवार, असा संघर्ष पाहायाला मिळणार आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये बारामतीचा देखील सहभाग आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष आहे.

अजित पवारांसह अनेक आमदारांनी साथ सोडल्यामुळे शरद पवार आता नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे ही शरद पवार गटाची जमेची बाजू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज पुण्यात झालेल्या बैठकीत देखील नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT