Sharad Pawar Criticism CM Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; मुख्यमंत्री तातडीने वर्षा निवासस्थानी दाखल

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर सुरुच आहेत. त्यातच शरद पवार अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत.

विशेष म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी निघाल्याने एकनाथ शिंदे तातडीने वर्षा निवासस्थानी दाखल झाले. दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना वर्षा निवासस्थानी बोलावल्याची माहिती आहे.

'वर्षा' निवासस्थानाच्या बाहेर उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना आतमध्ये बोलावण्यात आल्याची माहिती आहे. कदाचित दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. माध्यमांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT