Ajit Pawar and Jitendra Awhad  sakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : शरद पवार नावाचे मनगट आमच्याकडे; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला टोला

आमच्यकडून त्यांनी घड्याळ चोरले पण मनगट आमच्याकडे राहिले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला लगावला.

राहुल क्षीरसागर

ठाणे - मुळात हा पक्षच शरद पवार यांचा आहे. हे आता नियतीने ही दाखवून दिले. असे आमदार आव्हाड म्हणाले. आमच्यकडून त्यांनी घड्याळ चोरले पण मनगट आमच्याकडे राहिले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला लगावला.

बुधवारी रात्री आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. तसेच यावेळी आमदार आव्हाड यांनी शरद पवार यांचा फोटो असलेले नवीन पक्षाचे पोस्टर ही जाहीर केले. यावेळी बोलतांना, दम असेल तर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार असे नाव लावावे, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले. निवडणूक आयोगाचा निर्णय हा दुट्टपी आणि संभ्रम निर्माण करणारा आहे.

निवडणूक आयोग खोटे बोलत असून विरोधाभास दर्शवत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. शरद पवार यांना राजकीयदुष्टया संपविण्याचा कट रचनारे अजित पवार असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. तुम्ही पाकीटमारासारखे घड्याळ चोरले आहे. पण मनगट तोडायला विसरले. ते मनगट शरद पवार यांचे आहे. ते नव्या जोमाने उभे राहतील.

सावली देणाऱ्या वटवृक्षावर यांनी घाव घातला. यात सगळ्यांचा हातभार लागला आहे. हे शरद पवार यांचा राजकीयदुष्टया गळा घोटायला निघाले. पण नियती त्यांना येत्या काळात दाखवून देईल. की शरद पवार काय आहे. आजही सच्चे कार्यकर्ते अजून जिवंत आहे. एकीकडे ठाकरेचे घर उध्वस्त करायचे दुसरीकडे पवार यांना शरण आणण्याचा प्रयत्न करायचा. पण शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून ते डगमगणार नाहीत. ८४ व्या वर्षी शरद पवार यांना जे छळतात त्यांचा बदला जनता घेईल. हम लडेंगे और जितेंगे भी! असा निर्धार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT