Sharad Pawar And Nana Patole  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "त्यामध्ये काही चुकीचं नाही," नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar On Nana Patole As CM: माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत.

आशुतोष मसगौंडे

माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज सकाळी पवार यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

यावेळी पत्रकारांनी, काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत याबाबत शरद पवार यांना विचारले. तेव्हा पवार यांनी एका वाक्यात हा विषय संपवत कार्यकर्ते जर मागणी करत असतील तर यात काहीच चुकीचं नाही असे म्हटले.

काय म्हणाले शरद पवार?

चिपळूणमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले की, काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची आणि नागपूर शहरातील सर्व 6 जागा लढण्याची भाषा करत आहेत.

पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "कुठल्याही पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला नेता राज्यकर्ता व्हावा असे वाटत असेल तर यामध्ये काहीच चुकीचं नाही."

नागपूर शहरातील काँग्रेसच्या सर्व 6 जगांवरील दाव्याबाबत पवार म्हणाले, "जर ते म्हणत असतील सहाच्या सहा जागा लढवणार असे म्हणत असतील तर त्यावर मला आता काहीही बोलायचे नाही."

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

दरम्यान शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यावर पवार म्हणाले की, आमच्या दृष्टीने आज हा प्रश्न तातडीचा आहे असे आम्हाला वाटत नाही. महाविकास आघाडीत आम्ही तीन पक्ष आहोत. आम्ही निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार आहोत. हे करत असताना आणखी काही लोकांना, विचारांना आम्हाला आमच्यासोबत घेण्याची ईच्छा आहे."

राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात शरद पवार यांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे. यासाठी ते सतत राज्यातील विविध भगांमध्ये दौरे करत आहेत.

यापूर्वी पवार यांनी आधी कोल्हापूर आणि नंतर धुळ्यातील शिरपूर येथे शेतकरी संवाद मेळावा घेतला होता. यानंतर आता ते चिपळूण दौऱ्यावर आहेत.

जरांगे पाटलांना पाठिंबा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अशात चिपळूण येथे एका कार्यक्रमास आलेल्या शरद पवार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

यावेळी पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजांचाही विचार व्हायला हवा असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा झाला साखरपुडा? सचिनची होणारी सून आहे मुंबईतील बिझनेसमनची नात

Kalyan-Dombivli meat sale ban: मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयावर 'कल्याण-डोंबिवली' महापालिका आयुक्त गोयल ठाम!

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

SCROLL FOR NEXT