शरद पवार- नरेंद्र मोदी भेट sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार- नरेंद्र मोदी भेटीसंदर्भातील चार महत्त्वाचे मुद्दे

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली: देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात या दोन्ही नेत्यांमध्ये दुपारी १२.२० नंतर सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या केवळ दोन दिवस आधी या दोन्ही सर्वोच्च नेत्यांमध्ये ही भेट झाली आहे.

चर्चा कुठे आणि किती वेळ?

संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान १२.२० ते १२.४० अशी २० मिनिटं चर्चा झाली. यापूर्वी मागील वर्षी 17 जुलैला दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर प्रथमच दोन्ही नेते बुधवारी भेटले. यामुळे या भेटीचे राजकीय पडसाद उमटणे अपरिहार्य मानले जाते. संसदेच्या आवारातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली.

चर्चा नेमकी कोणत्या विषयावर?

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार पवार यांनी पंतप्रधानांची झालेल्या चर्चेत राज्याचेही काही प्रश्न मांडले आणि जीएसटी थकबाकी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह काही मुद्दे चर्चेत डोकावले असेही समजते.

ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भेट

केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यातील सत्तारूढ आघाडीच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या विरोधात चौकशी आणि तपास सत्र सुरू केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक आणि काही सत्तारूढ नेते यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने कालच कारवाई केली. त्यामुळे राज्य सरकार आणि भाजप तसेच केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा यांच्यात पुन्हा संघर्ष धुमसत आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी यांची भेट झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दोन्ही नेते याबाबत 'तातडीने' काहीही भाष्य करण्याची शक्यता नसल्याने राजकीय पतंगबाजी जोरात सुरू झाली आहे.

मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांसाठी स्नेहभोजन

पवार यांनी मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांना स्नेहभोजनसाठी आमंत्रित केले होते. सर्वपक्षीय खासदार आणि आमदार पवार यांच्या निवासस्थानी जमले होते. त्यात त्यांच्या एका बाजूला संजय राऊत, तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बसल्याचे छायाचित्रावरून दिसते. दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनी दिल्ली गाठून राज्य सरकारच्या विरोधात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. या साऱ्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी या सर्वोच्च नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने दिल्ली दरबारात तो उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT