Ajit Pawar and Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : जयंत पाटील म्हणतात, गेलेले नेते माघारी आले तर आनंदच; देवगिरीवर अजित पवारांची बैठक सुरु

संतोष कानडे

मुंबईः बरोबर दोन आठवड्यांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीतल्या आमदारांना सोबत घेऊन बंड केलं होतं. ज्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली ते मंत्री आज अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांचीही उपस्थिती होती.

बैठीनंतर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार काहीही बोलले नाहीत. परंतु आम्ही आमची बाजू मांडली आहे.

त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची एक बैठक वायबी सेंटरमध्ये झाली. त्या बैठकीनंतर बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं विधान करुन ते माघारी परतले तर आनंदच होईल, असं म्हटलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

आमची प्राथमिकता अशी आहे की, सगळे माघारी आले तर मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून आनंदच वाटेल. आम्ही सरकारमध्ये नाहीत. आमचे काही लोक तिकडे गेले आहेत, त्यांनी सरकारला समर्थन दिलेलं आहे. मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. शिवसेना आणि काँग्रेससोबत सध्या आम्ही पुढे जात आहोत.

दरम्यान, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार देवगिरिवर दाखल झाले. त्यांच्यासह अन्य सर्व मंत्री देवगिरिवर दाखल झालेले असून त्यांची बैठक सुरु आहे. एकीकडे वायबी सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठक झालेली असून दुसरीकडे देवगिरीवर पुन्हा खलबतं सुरु झालेली आहेत. या सगळ्या प्रकारात शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT