AJit Pawar and Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : पक्ष फुटलाच नसून एकसंध आहे! राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगामध्ये उत्तर दाखल करण्यात आलेलं असून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटलेला नसून शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली पदाधिकारी काम करतात, असं सांगण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा काका-पुतण्यातील राजकारणाबद्दल चर्चा होत आहेत.

अजित पवार गटाच्या याचिकेसंदर्भात ७ सप्टेंबरला शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे. त्यात म्हटलंय की, वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षामध्ये कसलीही फूट पडलेली नाही. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका विरोधाभासी असल्याचंही उत्तरात म्हटलेलं आहे.

राष्ट्रवादीने पत्रामध्ये काय म्हटलंय

अजित पवार गटाच्या दाव्यांना कोणताही कायदेशीर अथवा भौतिक आधार नाही. काही लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष अजूनही एकसंध असून शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे. निवडणूक आयोग आपले कर्तव्य निःपक्षपातीपणे पार पाडेल, असा देखील विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे.

अजित पवार गटाने केलेल्या दाव्यावर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या उत्तराने खरा पक्ष नेमका कुणाचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर अजित पवारांनी आयोग पारदर्शकपणे निर्णय घेईल, असं म्हटलंय. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT