Amol Kolhe 
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe: कधी कल्पनाही केली नव्हती, साहेबांमुळे शक्य झालं; पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कोल्हे भावूक

Dr. Amol Kolhe News: यासंदर्भातील माहिती अमोल कोल्हे यांनीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे. नवी जबाबदारी मिळाल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उपनेता, मुख्य प्रतोद म्हणून अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती अमोल कोल्हे यांनीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे. नवी जबाबदारी मिळाल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पोस्टमध्ये अमोल कोल्हे म्हणालेत की,एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले आहे.ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे.

लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ.सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार !, असं अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तिकीटावर आढळराव पाटील यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. पण, शेवटी लोकसभेचं मैदान अमोल कोल्हे यांनी मारलं आहे. सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ९ खासदार लोकसभेत आहेत. कोल्हे दुसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून लोकसभेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांना सुप्रिया सुळे यांच्यासोबत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT