Sharad Pawar and Anil Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ...बावनकुळेंनी अक्कल शिकवण्याची गरज नाही; अनिल देशमुख यांची टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेवर अनिल देशमुख म्हणाले की, बावनकुळे हे एका मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. मुळातच बावनकुळे यांची उंची कमी आहे. मात्र एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने पदाला शोभेल असच वक्तव्य करायला हवं. शरद पवारांची उंची खूप जास्त आहे. शरद पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला बावनकुळे यांनी अक्कल शिकवण्याची गरज नसल्याचं देशमुख म्हटलं.

देशमुख पुढं म्हणाले की, आमच्यापासून अनेक नेते दूर गेले, ते शरद पवारांना दैवत मानतात. पण शरद पवारांनी सूचना केल्या होत्या की, माझ्या फोटोचा वापर करू नये. त्याचे पालन त्यांनी केले पाहिजे.

बावनकुळे म्हणाले होते की, अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवारसाहेबांना दैवत मानतात. त्यामुळे त्यांचे फोटो लावतात. त्यामुळे शरद पवार यांनी त्याच आमदारांच्या मतदार संघात सभा घेऊन आपली उंची कमी करून घेऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT