Sharad Pawar on absence of ajit pawar when he takes back his resignation as national president of NCP  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : रोहित पवारांसकट तरुण नेते हजर, पण अजित पवार गैरहजर; शरद पवार म्हणाले...

रोहित कणसे

Sharad Pawar press conference: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांचा पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा अखेर मागे घेतला आहे.

पवार काय म्हणाले?

मुंबईतील वाय बी सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केलं. मात्र यावेळी अजित पवार मात्र अनुपस्थित राहील्याचे दिसून आले.

या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित राहीले नाहीत यावरून विचारलेल्या प्रश्नाल शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, सगळे पत्रकार परिषदला असतात का?

मात्र शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या सोनिया दुहान आणि आमदार संग्राम जगताप ही युवा ब्रिगेड शरद पवारांच्या अगदी मागे बसल्याचं पाहायला मिळालं.

मात्र अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेतील अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान राजीनामा मागे घेताना शरद पवार म्हणाले की, मी सर्वाचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान ठेवत निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. यापुढे पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाचे विचारधारा ध्येय धोरणे जन माणसात पोहचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन असे अश्वासन शरद पवारांनी यावेळ देशभरातील कार्यकर्त्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT