ncp Sharad pawar sakal media
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, राजकीय परंपरा पाळा"

दत्ता लवांडे

मुंबई : "अंधेरी येथी पोटनिवडणुक बिनविरोध होणे हे योग्य राहील, राज्यातील पक्षांने राजकीय परंपरा पाळणे गरजेचे आहे, कारण गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यावेळी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता" असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

(Sharad Pawar On Andheri By-Election)

अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका, कारण रमेश लटके यांचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचं आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार देऊ नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपलेली नाही. एका वर्षासाठी निवडणुका नको असं म्हणत पवारांनी सर्वपक्षीय आवाहन केलं आहे.

राज ठाकरेंनीही केलंय आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपला पत्र लिहित ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची भाजपकडे मागणी केली आहे. लटके यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका, हे आपल्या संस्कृतीशी सुसंगत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार न देण्याची भावनिक साद घातली आहे.

भाजपनेच राज ठाकरेंना पत्र लिहायला लावलं - अरविंद सावंत

भाजपनेच राज ठाकरेंना पत्र लिहायला लावलं आहे. भाजपने मानुसकी सोडली आहे, ही संवेदनाहीन माणसं आहेत त्यामुळे राज ठाकरेंनी या राजकारणात स्वत:ला गुंतवून घेऊ नये असं मत ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या पत्रामुळे संस्कृतीचा नाश होतोय हे भाजपला कळलं असं मत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींनी ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी 'पीएम-किसान' योजनेचा २२ वा हप्ता जारी केला

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT