Sharad Pawar on Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

गोवारी झालं तेव्हा... शरद पवार आपल्या मुद्द्यावर ठाम! फडणवीसांना दिलं रोखठोक उत्तर!

Sandip Kapde

Sharad Pawar on Devendra Fadnavis: जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत निषेध व्यक्त केला होता. महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला, असे शरद पवार म्हणाले होते. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला होता.

राजकारण करु नका, वाहत्या गंगेत हात धुऊ नका, तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं ते सांगा?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेतला. आरक्षण हायकोर्टात टिकवता आलं नाही, याचा दोष मला सहकाऱ्यांना देता येणार नाही. आमची भूमिका तेव्हा स्पष्ट झाली होती.

फडणवीसांनी २८ वर्ष पूर्वीची गोवारी घटना सांगितली. ते म्हणाले मी मुख्यमंत्री असताना नागपूरला आदिवासी समाजाचं आंदोलन झाले होते. गोवारी आंदोलन झाले त्यावेळी चेंगराचेंगरीत काही लोकांचा जीव गेला. त्यावेळी राजीनामा का देला नाही, असं फडणवीस म्हणाले.

शरद पवार म्हणाले, यामध्ये दोन गोष्टी आहे. ज्यावेळी गोवारी आंदोलन झाले त्यावेळी मी नागपुरात नाही तर मुंबईत होतो. दुसरी गोष्टी माझ्या मंत्रिमंडळातील आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिला कारण हा आदिवासी समाजाशी सबंधित प्रश्न होता. नैतिक जबाबदारी स्विकारुन पिचडांनी राजीनामा दिला. तो राजीनामा आम्ही स्विकारला होता.

ज्यांनी (देवेंद्र फडणवीस) मला प्रश्न विचारला त्यांच्याकडे गृहखात्याची नैतिक जबाबदारी आहे. फडणवीसांनी गोवारी आणि पिचडांच्या काळातील सरकारच्या धोरणांचे स्मरण करावे. त्यांना स्वत:ला प्रशासन कसे चालवावे याचे उदाहरण मिळेल, असे शरद पवार म्हणाले.

एवढं मोठं प्रकरण झालं. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. याची जबाबदारी घ्यायची असते, असा टोला शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला.

आर आर पाटील मंत्रिमंडळात असताना असाच प्रकार झाला होता. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्यांच्याकडून कमतरता झाली. त्यानंतर आर आर पाटील यांनी राजीनामा दिला होता. हा महाराष्ट्राचा आदर्श आहे, असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT