ncp leader sharad pawar reaction on chandrakant patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

"चंद्रकांत पाटलांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न"

"त्यांनी दगड छातीवर ठेवू की डोक्यावर ठेवू आम्हाला काय त्याचं? त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे." असा टोला पवारांनी लावला आहे.

दत्ता लवांडे

पुणे : आमचे नेते एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी आली होती तरी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा दिली नव्हती असा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला होता. यावरून बरेच आरोप प्रात्यारोप झाले आहेत. त्यानंतर शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना त्यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

(NCP Sharad Pawar On Eknath Shinde)

"सुरक्षा कुणाला द्यायची आणि का द्यायची हा निर्णय घेण्यासाठी राज्याचा मुख्य सचिव, आणि पोलिस अधिकाऱ्यांची एक समिती असते ते निर्णय घेत असतात. आज माझी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट झाली होती. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. त्यामुळे त्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही." असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही छातीवर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि दिल्लीतून निर्णय आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, "त्यांनी दगड छातीवर ठेवू की डोक्यावर ठेवू आम्हाला काय त्याचं? त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे." असं शरद पवार म्हणाले आहेत.

त्याचबरोबर राज्यातील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना पवार म्हणाले की, "राज्याची सत्ता त्या दोघांनीच चालवायचं ठरवलं दिसतंय आणि त्याला त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची साथ आहे. ते आता सत्ताधारी आहेत म्हणून साहजिकच ते जे काय करतील ते आपल्याला स्विकारावं लागेल." असं मत व्यक्त करत शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

नितेश राणेंसारख्या पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देत नाही असं म्हणत नितेश राणेंना शरद पवारांनी डिवचलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT