Sharad Pawar_Bhagat Singh Koshyari Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यपाल कोश्यारींच्या भूमिकेवरून शरद पवारांचे ताशेरे; म्हणाले, दोन वर्ष...

दत्ता लवांडे

धुळे : धुळे येथील नूतनीकरण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नावर भाष्य केलं आहे. राज्यातील शेतकरी, त्यांचे प्रश्न, राज्यातील सरकार, सूडाचं राजकारण अशा विविध विषयांवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांनी दोन वर्षापासून विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्तावावर सही केली नाही असं म्हणत पवारांनी टीका केली आहे.

(Sharad Pawar On Governor Baghat singh Koshyari)

राज्यात ज्याच्या हातात सत्ता आहे तेच पूर्व दिशा ठरवत आहेत असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव दोन वर्षापासून प्रलंबित ठेवला. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालाकडे प्रस्ताव पाठवला पण राज्यपालांनी त्यावर सही केली नाही. पण नवं सरकार आल्यावर दोनच दिवसात हा निर्णय घेण्यात आला आणि त्यांच्या मनासारखा अध्यक्ष मिळाल्यानंर समाधान व्यक्त केलं अशी टीका पवारांनी केली.

"हे का होतंय तर आमच्या हाती सत्ता आहे. आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, आम्हाला आवडले नाही तर आम्ही देऊ ती सजा अशी आग्रही आणि टोकाची भूमिका घेतली जात आहे. महाराष्ट्रात विधानसभेचा अध्यक्ष घेण्याचा निर्णय घेतला गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनी दोन वर्षे त्यावर सही केली नाही. तोपर्यंत ही जागा रिक्त होती. जेव्हा सरकार बदलले तेव्हा नवा मुख्यमंत्री आल्यावर दोन दिवसांत आदेश काढला आणि निवडणूक घेऊन आपल्याला हवा तसा अध्यक्ष आला याचे समाधान व्यक्त केले." असं पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत लोकसभेत झालेल्या गोंधळावर त्यांनी भाष्य केलं आहे. सोनिया गांधी यांना एका महिला खासदाराने बाहेर नेलं नाहीतर लोकसभेत काय गोंधळ झाला असता याची कल्पना नाही अशा शब्दांत लोकसभेतील गोंधळावर खंत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT