Sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad pawar: शरद पवार मोदी सरकारवर संतापले; 'या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही'

शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

धनश्री ओतारी

मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाला असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक यांनी केला होता. तसंच या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मला शांत राहण्यास सांगितल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. त्यानंतर पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Sharad Pawar On Modi Government pulwama attack)

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. अशा शब्दात पवार यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

'पुलवामामध्ये जवानाची हत्या कशामुळे झाली. त्या ठिकाणी असणाऱ्या राज्यपाल मलिक त्याची नियुक्ती भाजपने केली होती. जवानांना हवं ते साधन न मिळाल्याने त्याचा जीव गेला असे मलिकांनी सांगितले. त्यांनी देशाच्या वरिष्ठांना हे सांगितले.

पण त्यांनी न बोलण्यासाठी त्यांना सागितले. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही.' असे परखड मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

तसेच, आज शेतकरी अडचणीत आहे. दहा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये शेतकरी मेळाव्याला गेलो. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं. निसर्ग आपल्या हातात नाही पण संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढणे सरकारची जबाबदारी आहे.

शेतकरी आत्महत्या करतात हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे. असं शरद पवार म्हणाले.

यासोबतच, आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊसामुळे हाहाकार झाला आहे पण अजून मदत मिळाली नाही. शेतीमाल निर्यातीला बंदी आणि माल आयत करण्यासाठी परवानगी दिली यांची पूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर आहे. या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. याबाबत निर्णय घेतला पाहिजे. असा पुनरुच्चार पवारांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Khutbav News : शेतकरी महिलेने शेतीकाम करत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वाजवला गौरवाचा डंका

Latest Marathi News Live Update : त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टला राज्यसरकारकडून ५० लाख रुपयांची मदत

IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामन्यादरम्यान Viral झालेली ही मिस्ट्री गर्ल कोण? नेटिझन्सनी Grok चं डोकं खाल्लं...

Video: ''लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय'', भाजपच्या मंत्र्यांचं सभागृहात विधान

SCROLL FOR NEXT