महाराष्ट्र बातम्या

...म्हणून मला राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही - शरद पवार

नामदेव कुंभार

सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता. त्यानंतर सत्तांतर झालं. आम्ही विरोधीपक्षात गेलो. या काळात अनेक मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला. पण त्यामुळेच पक्षात अनेक नवीन नेतृत्व तयार झालं. याआधी त्यांचं कतृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. नवीन नेतृत्व तयार झाल्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, असा विश्वास पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी तमाम कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले.

आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संघटना उभी करण्याची भूमिका स्वीकारली, ती कितपत योग्य होती याचा आढावा घ्यायचा आजचा दिवस आहे, असे शरद पवार म्हणाले. सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसं झाल्यास ती भ्रष्ट होते. सत्ता अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेचा भाग असल्याची जाणीव व्हायला हवी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वर्षांचा प्रवास पाहिल्यास, या पक्षानं महाराष्ट्रात मोठी नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे, असं शरद पवार म्हणाले.

राज्यातील सरकार पाच वर्ष टिकेल -

शिवसेना विश्वासू पक्ष आहे. त्यामुळे हे सरकार नक्कीच पाच वर्षे टिकेल. आपण महाविकास आघाडीचा पर्याय दिला, लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

Mumbai BEST Bus Strike : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

साखर कमी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर! रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं जांभूळ मध 'या' आजारासाठीही ठरतं वरदान

Stock Market Today: एका रिपोर्टने शेअर बाजारात घातला धुमाकूळ! Infosysy, TCS, Tech M कोसळले; नेमकं काय घडलं?

'मला स्वत:ची लाज वाटायची' या कारणामुळे रसिका सुनील मध्यंतरी होती गायब, म्हणाली...'चेहरा इतका..'

SCROLL FOR NEXT