Sharad Pawar Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "शिवसेनेबाबतच्या निर्णयात केंद्राचा हस्तक्षेप पण मला चिन्हाची चिंता नाही"

दत्ता लवांडे

छत्रपती संभाजीनगर : पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली असून आज ते छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. ना.धों. महानोर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ ते संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या भूमिकेवर सडकून टीका केली. त्याचबरोबर मला माझ्या पक्षात फूट झाली तर चिन्हाची चिंता नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं.

केंद्रातील सत्तेचा वापर करून संस्थांचा गैरवापर करून भाजपने अनेक सरकार पाडली आहेत, उद्धव ठाकरे यांचं सरकारही भाजपने पाडलं. आता अजित पवार गट जरी भाजपसोबत गेला असला तरी मला पक्षाची चिंता नाही. शिवसेनेबाबतच्या निर्णयात केंद्राने हस्तक्षेप केला म्हणून हा निर्णय ठाकरेंविरोधात लागला आणि पक्षचिन्ह शिंदे गटाकडे गेले असंही पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांना कृषीमंत्रीपद आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद आणि इतर काही ऑफर अजित पवारांद्वारे देण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोणी काय विधान केलं ते मला माहित नाही. आमच्या गुप्त बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाली नाही. भेट झाली होती. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझा सल्ला घेण्याची पद्धत आमच्या परिवारात आहे. त्यातून गैरसमज करून घेण्याचं कारण नाही, असंही पवार म्हणाले.

उद्या बीडमध्ये सभा तर रविवारी करणार पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

उद्या (१७ ऑगस्ट) शरद पवार यांची बीडमध्ये सभा असून त्यानंतर ते रविवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सोशल मीडिया फंडच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यासुद्धा उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT