Sharad Pawar on ShivSena esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar on ShivSena: "निकालाबाबत सत्ताधाऱ्यांनी आधीच भाष्य केलं होतं, त्यामुळं.." शरद पवारांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. पण जो निकाल समोर आला आहे त्याचं भाष्य सत्ताधाऱ्यांनी आधीच केलं होतं. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालानंतर मांडली. (Sharad Pawar on ShivSena MLA disqualification says Uddhav Thackeray should go to Supreme Court)

ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागेल

पवार म्हणाले, हा आश्चर्यकारक निकाल आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यासह त्यांना खात्री होती निकाल काय लागणार आहे, यावर त्यांनी भाष्यही केलं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरेंना आता सुप्रीम कोर्टात जावं लागेल. त्याच ठिकाणी त्यांना न्याय मिळण्याची खात्री आहे. आजच्या निकालात विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यामध्ये विधी मंडळ पक्षाला महत्व दिलं आहे.

सुप्रीम कोर्टात अपिलासाठी चांगली परिस्थिती

सुभाष देसाई यांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं पक्ष संघटना महत्वाची आहे असा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशात स्वच्छ म्हटलं आहे की व्हीपची निवड राजकीय पक्ष करेल. व्हीप मोडला म्हणून शिंदेंवर कारवाई करावी असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे गटावर कारवाई केलेली नाही तसेच शिंदे गटाच्या मागणीवरुन ठाकरे गटावर व्हीप मोडला म्हणून कारवाई केलेली नाही. यामुळं उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात अपिलात जाण्यासाठी चांगली परीस्थिती निर्माण झाली आहे.

सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स बाजूला ठेऊन निर्णय

सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन बाजूला ठेऊन हा निर्णय घेतला आहे. हा न्यायालयीन निर्णय नाही हा राजकीय निर्णय आहे. त्यामुळे आम्हाला जनतेसमोर जाण्यासाठी चांगली परीस्थिती आहे. त्यासाठी हा निर्णय चांगला आहे, आम्ही जनतेसमोर हा निर्णय घेऊन जाऊ. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिंदे होते, त्यावेळी ठाकरेंच्या नेतृत्वात शिंदे काम करत होते. त्यामुळं शिवसेना कोणाची हे सर्वांना माहिती आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टात भक्कम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT