Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Latest Update : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले, 'चांगली....'

Maharashtra Politics : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली

अंकिता खाणे (Ankita Khane)

Uddhav Thackeray and Raj Thackeray Yuti : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणं निर्माण झाली. तर राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता मिळावी यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

दरम्यान या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. विशेष म्हणजे काल (गुरुवारी) मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेल्याची चर्चा सुरू झाली. तर ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. त्यावर पवारांनी स्मित हास्य करत तीनच शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(Latest Marathi News)

अजित पवारांच्या मोठ्या निर्णयानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत राज्यात होर्डिंगही लागले आहेत, शरद पवार यांनी यावर प्रतिक्रीया देताना, "चांगली गोष्ट आहे", असं म्हंटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

तर पुढे बोलताना शरद पवार म्हणाले कि, 'मला पूर्ण विश्वास आहे, २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल. आज जे सत्तेत आहेत त्यांना लोक सत्तेपासून दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी केल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल,” असंही ते म्हणालेत.

वय ८२ असो वा ९२ मला फरक पडत नाही

वयावर प्रश्न उठवणाऱ्या अजित पवारांना प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी अजुनही सक्रीय आहे. मग ८२ काय आणि ९२ काय मला फरक पडत नाही, असंही पवार म्हणाले. अर्थात पवारांनी वयाच्या ९२ पर्यंत सक्रिय राहण्याचे संकेत दिले आहे. तसेच शरद पवार यांनी निवडणूक आयोगात जाण्याऐवजी, सुप्रिम कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्याची वेळ येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT