Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

"राज्यपालांच्या टोपीच्या अन् अंत:करणाच्या रंगात बदल नाही" - शरद पवार

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरात वातावरण पेटलं आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्याच्या कष्टातून मुंबईचं वैभव उभं राहिलं असून मुंबईबद्दल अशी विधान करणं शहाणपणाचं लक्षण नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.

(Sharad Pawar on Statement of Governor Bhagatsingh Koshyari)

राज्यपालांबद्दल काय बोलायचं हे सागणं कठीण झालंय, याअगोदरही ज्योतिराव फुलेंबाबतही असंच वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशा वादग्रस्त वक्तव्यांची त्यांच्याकडून पुनरावृत्ती होत आहे. पण मुंबईचं वैभव हे मराठी माणसाच्या कष्टाने उभं राहिलंय, राज्यपालांच्या वक्तव्याच्या जास्त खोलात मी जात नाही पण त्यांची जी टोपी आहे, तीचा रंग आणि त्यांच्या अंत:करणाच्या रंगात बदल नाही वाटंत. त्यांनी अशी विधानं करणं शहाणपणाचं लक्षण नाही अशी बोचरी टीका पवारांनी केली आहे.

"गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईतून गेले तर मुंबईत पैसे राहणार नाही. तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे तीसुद्धा राहणार नाही" असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी केले होते. त्यानंतर, अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर टीका केली असून मी राज्यपालांच्या या वक्तव्याशी सहमत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मुंबई घशातंच घालायची आहे हे उघडपणे सांगितल्याबद्दल आभार असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT