Sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार ? खुद्द शरद पवार यांनी दिले संकेत

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी पूर्ण झाली, पण...

धनश्री ओतारी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी पूर्ण झाली. तब्बल 9 महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. (Sharad Pawar on supreme court uddhav thackeray vs eknath shinde maharashtra politics )

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी येणार? यासंदर्भात शरद पवार यांनी सवाल उपस्थित केला. त्यावर त्यांनी निकाल कधी लागेल हे सांगता येणार नाही. पण निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.

कारण घटनापीठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल लवकर लागेल. बघुया काय होतयं. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

याआधी बारामती दौऱ्यावर असताना पवार यांनी शिंदे सरकारवर भाष्य केलं होतं. सध्या भाजप व शिंदे यांचे विधानसभेत बहुमत आहे. सर्वोच्च न्यायालयात काहीही निकाल लागला तरी त्याचा परिणाम सरकारवर होणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले होते.

यापूर्वी ज्येष्ठ सरकारी वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी यासंदर्भात मोठी अपडेट दिली होती. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागेल, हे आत्ता जरी सांगणे कठीण आहे. परंतु माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होत आहे. त्यापूर्वी हा निकाल लागले. यामुळे सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली होती.

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. त्यातील न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 14 मेच्या आधी हा निकाल लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT