Sharad Pawar Phone Called uday samant over agitation agains ratnagiri barsu refinery project survey  
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery News :…तर प्रोजेक्ट अडचणीत येईल; शरद पवारांची उद्योगमंत्री सामंतांशी चर्चा

रोहित कणसे

कोकणातल्या बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पोलिस दाखल झाले आहेत. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली आहे. पवारांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवारांनी हा सर्व्हे थांबवा, लोकांशी आपण चर्चा करुया, एकत्र बसून विश्वासात घेऊन केलं पाहिजे नाहीतर प्रोजेक्ट अडचणीत येईल अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांना मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना कळवतो असे अश्वासन दिले आहे. तसेच उदय सामंत आणि शरद पवार यांच्यात उद्या (२६ एप्रील) भेट होणार आहे. ही भेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवसस्थीनी होणार असून या भेटीत बरसू प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

२५ महिलांना अटक

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. यादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला.


मात्र यानंतर देखील आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत. राजापूरमधील महिलेने 'जीव गेला तरी इथेच थांबेन' असा इशारा दिला आहे. कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी 'रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग' प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे.

आंदोलन पेटलं

कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पण जीव गेला तरी इथेच थांबेन. अशी स्थानिक महिलांची भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

SCROLL FOR NEXT