sharad pawar and sunil tatkare sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Latest News : 'चांद्रयान 3'वरून नेहरूंच कौतुक केलं पण...; तटकरेंचा नाव न घेता शरद पवारांना टोला

रवींद्र देशमुख

Mumbai News - देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. या आघाडीची बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी सुरू आहे. त्याचवेळी आज राज्यात महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, अजितदादांच्या नेतृत्वात एक नवा विचार घेऊन देशभरात काम.करण्याचे निर्णय घेतला. आपल्या सर्वांना जमण्यास काहीसा उशीर झाला आहे. आपले उद्दिष्ट 48 - 0 आहे. यापुढे असच एकत्र येत राहू.

चांद्रयान-३ मोहिमेच्या यशावर तटकरे म्हणाले की, त्या दिवशी मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी सरकारचं कौचुक करायला हवं होतं. मात्र त्यांनी नेहरूंचं कौतुक केलं. बांगलादेशची निर्मिती करताना वाजपेयी साहेबांनी कौतुक केलं होतं. राजीव गांधींनी संगणक युग आणले, त्याला कुणी विरोध केला नाही.

वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी नेहरुंचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं. दरम्यान तटकरे यांनी खरगे यांचं नाव घेऊन शरद पवार यांच्यावरच निशाणा साधल्याचं दिसून आलं.

दरम्यान आता एकत्रितपणे काम करावं लागेल. आम्ही विरोधात लढलो तो इतिहास झाला. कुणाच्या पदरात काय पडणार यापेक्षा राज्याच्या विकासाचा व्यापक विचार केला पाहिजे. फक्त लोकसभा नाही तर विधान सभा सुद्धा एकत्र लढून जास्त जागा जिंकण्याचा संकल्प करू, असंही तटकरे यांनी नमूद केलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT