Sharad Pawar Press Conference e sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार राज ठाकरेंना उत्तर देणार? दुपारी पत्रकार परिषद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज ठाकरेंनी शरद पवारांवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. ते प्रत्येकवेळी शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात, असं राज ठाकरे (Raj Thackeray on Sharad Pawar) म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पवार राज ठाकरेंना प्रत्युत्तर (Sharad Pawar Reply Raj Thackeray) देण्याची शक्यता आहे.

शरद पवार भाषणात प्रत्येकवेळी शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असा उल्लेख करतात. पण, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कधीही म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लीम मते गमावण्याची भीती वाटते. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांपूर्वी छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. अफजल खान महाराष्ट्रात आला तो काही धार्मिक उद्देशाने आला नव्हता. मग तो काय महाराष्ट्रात केसरी टूर्स किंवा वीणा वर्ल्डचे तिकीट बूक करून महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का? असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.

शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळं ते धर्माकडं नास्तिकतेनं पाहतात. ते धर्म, देव काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात. देशात, महाराष्ट्रात असंख्य जाती आहेत. प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष सुरू झाला, असा आरोप राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला. शरद पवार या सर्व आरोपांना आजच्या पत्रकार परिषदेतून उत्तर देणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

SCROLL FOR NEXT