Sharad Pawar anil patil shinde fadanvis  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : जळगावात शरद पवार कोणाला करणार टार्गेट? मंत्री अनिल पाटील निशाण्यावर; भाजप-शिंदे गटाचाही घेणार समाचार

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते जळगाव जिल्ह्यात सभा घेणार आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून शरद पवार पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

जळगाव शहरातील सागर पार्कवर जाहीर सभा घेतली जाणार आहे. दुपारी दीड वाजता सभेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ते सायंकाळी महापौर जयश्री महाजन (ठाकरे गट) यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेणार आहेत.

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटी नंतर जळगाव जिल्ह्यात ही शरद पवारांची पहिलीच सभा आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सुमारे 30 हजार नागरीक या ठिकाणी उपस्थित राहतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. जिल्हा राष्ट्रवादी कडून राज्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी सभा व्हावी यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. जे आता अजित पवार गटात असून सध्या राज्याचे मंत्री आहेत. मंत्री अनिल पाटील यांच्यावर शरद पवार या सभेमध्ये नक्की काय म्हणतात? मंत्री अनिल पाटील यांच्यावर शरद पवार टीकास्त्र सोडतात का? याचबरोबर जळगाव जिल्ह्यात आपल्या गटाला संजीवनी देण्यासाठी नक्की शरद पवार काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अकरा आमदारांपैकी नऊ आमदार हे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाकडे आहेत. तर गिरीश महाजन व गुलाबराव पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. यामुळे शरद पवार यांच्यावरही निशाणा साधतात का? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच बनलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT