Modi_Sule_Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवरुन राष्ट्रवादीला टार्गेट करणाऱ्या PM मोदींना पवारांचं उत्तर; म्हणाले, हे खरंय...

PM मोदींनी भोपाळमधील भाजपच्या मेळाव्यात राष्ट्रवादीला का मत देऊ नये हे सांगताना सुप्रिया सुळेंचा दाखला दिला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : PM मोदींनी भोपाळमधील भाजपच्या मेळाव्यात राष्ट्रवादीला का मत देऊ नये हे सांगताना सुप्रिया सुळेंचा दाखला दिला होता. त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधानांसाठी अशी विधानं अशोभनिय असल्याचं म्हटलं आहे. (Sharad Pawar reply to PM Modi for targeting NCP over Supriya Sule in Bhopal BJP rally)

काय म्हणाले शरद पवार?

पवार म्हणाले, "उद्याच्या देशाच्या निवडणुकांमध्ये काय होईल याची खात्री नसल्यामुळं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय आहेत अशा प्रकारची विधानं केली आहेत. उदाहरणार्थ माझ्या पक्षाबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं. हे करत असताना त्यांनी सांगितलं की, शरद पवारांच्या मुलीला पुढे न्यायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला मत द्या"

मोदींनी काहीही सांगितलं तरी...

पण हे खरंय की माझी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर तीन वेळेला लोकसभेत निवडून आलेली आहे. एखाद्या वेळेला बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुकीत नाही. पण त्यानंतरही सुप्रिया सुळे यांची संसदेच्या कामगिरीत ९८ ते ९९ टक्के उपस्थिती आणि जास्तीत जास्त कामकाजात सहभाग आणि प्रश्न विचारण्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे इतकंच नव्हे तर उच्च दर्जाचा आहे. (Latest Marathi News)

संसदेतील कामगिरीचा अभ्यास करुन खासदारांना पुरस्कार देते अशा संस्थेच्यावतीनं सुप्रिया सुळे यांना आठ वेळेला पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळं मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वतःचं कर्तृत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमीच मतं देत नाही, अशा शब्दांत पवारांनी PM मोदींना उत्तर दिलं. (Marathi Tajya Batmya)

पवार पुढे म्हणाले, "त्यामुळं पंतप्रधानांचं संसदेच्या सदस्यांबद्दल असं मत व्यक्त करणं हे अशोभनिय आहे. कारण संसद ही एक संस्था आहे. मी स्वतः पंतप्रधानांवर व्यक्तीगत टीका करत नाही कारण ते देखील एक संसदीय संस्था किंवा पद आहे. या संसदीय संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे पण हे ठेवताना संसदेचे सदस्य हे देखील या संस्थेचा भाग आहे त्यामुळं त्यांचाही सन्मान ठेवला गेला पाहिजे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT