Sharad pawar resign as ncp chief hold till lok sabha election political leaders appeal to withdraw sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ‘लोकसभे’पर्यंत थांबा; देशभरातील राष्ट्रीय नेत्यांची पवारांना साद

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर इतर राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर देशभरातील स्वपक्षीय नेत्यांसह इतर समविचारी पक्षांची कोंडी झाली आहे.

पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका देशभरातील भाजपविरोधी पक्षांची असून, जर त्यांना निर्णयावर ठाम रहायचे असेल, तर किमान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी निर्णय मागे घ्यावा अशी, या नेत्यांची भूमिका असल्याचे समजते.

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर इतर राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी, एम. के. स्टॅलिन यांनीही पवारांशी संपर्क साधत विचारणा केल्याचे सांगण्यात येते. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशीच भावना भाजपविरोधात देशपातळीवर काँग्रेससह जे जे पक्ष एकत्र येत आहेत त्या सर्व पक्षांच्या नेत्यांची आहे.

राष्ट्रवादीच्या केरळ, मेघालय, हरियाना, बिहार, गुजरात, मणिपूर, लक्षद्वीप, गुजरात, नागालँण्ड येथील प्रदेश नेत्यांनाही या निर्णयाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीच्या विविध राज्यांतील नेत्यांसोबत पवारांची उद्यापासून (ता.५) प्रत्यक्ष चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

समितीची आज बैठक

नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवार यांनी नेमलेल्या समितीची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक आहे. या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे,

छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदापासून दूर जाऊ नये, यावर चर्चा होऊन ठराव होईल असे संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT