sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने प्रफुल्ल पटेलांना विचारला जाब

तुम्ही तर नंबर दोनचे नेते आहात ना?

रुपेश नामदास

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेने राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पक्षाच्या नेत्यांना धक्का बसला असून, याची प्रचिती आज आली. केरळमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पी. सी. चाको यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना तुम्ही पक्षात आघाडीचे नेते असताना शरद पवार यांच्या निवृत्त होण्याच्या घोषणेची कल्पना कशी नव्हती, असा प्रश्‍न विचारला.

केरळचे पी. सी. चाको आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले. शरद पवार यांच्या भेटीनंतर तेथे उपस्थित असलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांना ते म्हणाले की, ‘‘प्रफुल्लजी तुम्ही तर पक्षात क्रमांक दोनचे नेते आहात. तरी तुम्हाला या निर्णयाबद्दल काहीच माहिती कसे नाही?’’ यावर पटेल यांनी आम्हा कुणालाही याबाबतची कल्पना नव्हती, अशी कबुली दिली.

पी.सी.चाको यांच्या पचनी पटेलांचे उत्तर पडले नाही. हे असे कसे झाले ? असा सवाल करत हा निर्णय होत असताना किमान पटेल तुम्ही तरी सांगायला हवे होते, अशा शब्दांत अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या भावनेवर पटेल देखील निरुत्तर झाल्याचे चित्र होते. पी. सी. चाको हे केरळमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत.

त्यांनी काँग्रेस पक्षामधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या वेळी ते काँग्रेस वर्किंग कमिटी (सीडब्लूसी) या पक्षांतर्गत सर्वोच्च समितीचे सदस्य होते. सध्या केरळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आमदार असून तेथील सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस सहभागी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT