Anil Patil_Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या निर्णयाचे पडसाद उमटायला सुरुवात; अनिल पाटलांचा राजीनाम्याचा इशारा

पवारांच्या निर्णयानंतर राज्यातील काही जिल्हाधक्षांनीही आपले राजीनामे दिले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदापासून निवृत्ती जाहीर केली. यामुळं राष्ट्रवादीत खळबळ माजली असून त्यांच्या निर्णयाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. विविध पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे द्यायला सुरुवात कली आहे. त्यातच आता अनिल पाटील यांनी आपल्या राजीनाम्याचा इशारा दिला आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

अनिल पाटील म्हणाले, "शरद पवारांनी त्यांच म्हणणं आज सर्व कार्यकर्त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांच्या या निर्णयाशी देशभरातील कार्यकर्ते सहमत नाहीत. हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी आणि शरद पवार हे नाव एकमेकांशी जोडलेलं आहे"

"आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत ते आपला निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत त्याचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न करु. शरद पवारांनी आपल्या दृष्टीकोनातून निर्णय घेतला आहे. त्यांच्या वयाच्या दृष्टीनं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण जोपर्तंय ते आहेत तोपर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहतील हा आमचा निर्णय आहे. पण जर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल"

दरम्यान, शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी टाहो फोडला आहे. निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाजेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राज्यभर राजीनामा मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

Hockey Tournament: 'चीनमधील स्पर्धेत सातारकर खेळाडूंची चमकदार कामगिरी': हॉकीपटू वैष्णवी, ऋतुजाचे ‘चक दे इंडिया’; भारतीय संघाचे यश

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT