Sharad Pawar Resigns 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : "बोलवण्याची गरज वाटली नसेल" जयंत पाटलांना बैठकीच निमंत्रण नाही, नाराजीसत्र सुरूच

Sandip Kapde

महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होण्याची शक्यता आहे. पवारांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या राजीनाम्यावर विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र शरद पवार त्यांच्या विधानावर ठाम असून सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान या निर्णयामुळे राष्ट्रवादीत धूसफूस निर्माण झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील नाराज असल्याची चर्चा आहे. आज वाय बी सेंटरमध्ये होत असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीचे जयंत पाटील यांना आमंत्रण नसल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला आहे. जयंत पाटील पुण्यात आहेत. जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी राजीनामा द्यायला नको होता. मला अनेक आमदारांनी, कार्यकर्त्यांनी पवार यांनी राजीनामा देऊ नये, अशी मागणी केली आहे. माझी आणि शरद पवार यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. आजच्या बैठकीबद्दल माहित नव्हतं.

आज हे बैठक हे मला माहित होतं. मला कोणीही याबाबत मला कल्पणा दिली नव्हती. आज माझी साखर संकुलात आयुक्तांसोबत बैठक आहे. ही बैठक झाल्यावर मी निघून जाणार आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असून देखील जयंत पाटील यांना बैठकीची कल्पना नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत कलह असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांचा फोन आल्यामुळे मी मुंबईला जाणार, असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मला बोलवण्याची त्यांना गरज वाटली नसेल . मी पक्षावर नाराज नाही आणि पक्षही माझ्यावर नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT