Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns  
महाराष्ट्र

Sharad Pawar Resigns : सिल्व्हर ओकवरील बैठक संपली! शरद पवार काय म्हणाले? जयंत पाटलांनी दिली माहिती

Sandip Kapde

Sharad Pawar Resigns : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांच्या उत्तराधिकारीबाबत निर्णय होणार होता, मात्र या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला.

बैठकीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने पक्षप्रमुख शरद पवार यांना अध्यक्ष पदावर कायम राहण्याची विनंती केली.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करत आहेत. मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. समितील सदस्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना निर्णय कळवला आहे. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका आता महत्वाची आहे.

निवड समितीने मांडलेल्या ठरावर शरद पवार यांनी विचार करण्यास वेळ मागितला आहे. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. तातडीने निर्णय घेण्याची विनंती शरद पवार यांना करण्यात आल्याचे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

शरद पवार यांनी निवड समितीतील सदस्याचे म्हणने ऐकून घेतले आहे. त्यामुळे ते आता निर्णय घेणार आहेत. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली. देशभरता शरद पवार यांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी मागणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT