Sharad Pawar Resigns 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: अजितदादांची एन्ट्री होताच कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, 'देश का नेता कैसा हो...'

अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची बैठक

धनश्री ओतारी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही पवार यांनी माघार घेतलेली नाही. अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची बैठक होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अजित पवार याच बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांची एन्ट्री होताच कार्यकर्त्यांनी घोषणा सुरु केल्या. 'देश का नेता कैसा हो...शरद पवार जैसा हो...', अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी अजित पवार यांनी कोणतीही रिअॅक्शन न देता पक्षाच्या कार्यालयात निघून गेले.

अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. त्यात पवार यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या समितीत एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे.

अशी आहे समिती

समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Muslim Population: भारत जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश बनणार; प्यू रिसर्चची धक्कादायक आकडेवारी

Jayant Patil Resign : शरद पवार गटाने अखेर भाकर फिरवली....जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, नवा प्रदेशाध्यक्षही ठरला!

टीआरपी घसरुनही स्टार प्रवाह नंबर एकवर कायम ! शर्यतीत आता कलर्स मराठीला मागे टाकत 'या' वाहिनीची एंट्री

लव्ह जिहाद प्रकरण : शान खानने नाव बदलून हिंदू मुलीशी केली मैत्री अन् 2 वर्षे ठेवले शारीरिक संबंध; आता लग्न करण्यास दिलाय नकार

आणि मरेपर्यंत लक्ष्याची ती इच्छा पूर्ण झालीच नाही... वर्षा उसगावकरांनी सांगितली कुणालाही माहीत नसलेली गोष्ट

SCROLL FOR NEXT