ncp ajit pawar sanjay raut sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'राष्ट्रवादीत कुठलाही हस्तक्षेप करणार नाही', अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर राऊतांची भाषाच बदलली

संतोष कानडे

मुंबईः शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्यात संजय राऊत यांची प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 'रोखठोक'मधून शरद पवारांच्या कुटुंबातील आणि पक्षातील घडामोडींचा मागोवा घेऊन नंतर वादाला तोंड फोडलेल्या राऊतांनी मात्र सपशेल माघार घेतल्याचं दिसून येत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी अजित पवार हे भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याच गरमागरमीत संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक सदरामध्ये एक लेख लिहिला. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीचा इतिवृत्तांत दिला होता. त्यात शरद पवार यांनी कुटुंबामध्ये दबाव असल्याचं सांगत, कुणाला कुठे जायचं असेल तर जाऊ शकतं परंतु पक्ष म्हणून कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असं पवार म्हणाल्याचं राऊतांनी लिहिलं होतं.

त्यांच्या लेखानंतर राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ झाला. अजित पवारांनी भाजप प्रवेशाच्या वावड्या असल्याचं सांगून कुणीही दुसऱ्या पक्षात हस्तक्षेप करु नये, आपापल्या पक्षाचं बघावं; असा थेट इशारा दिला होता. राऊतांनीही त्यांना उत्तर दिलं. परंतु नंतर प्रकरण मिटलं.

आज शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मात्र संजय राऊतांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, मी दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या अंतर्गत बाबींवर बोलणार नाही. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नसून ही खेळी आहे, असं वाटत नाही. कुणी काय करावं याचे सल्ले मी देणार नसल्याचंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी धरणं धरल्यानंतर राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांशी शरद पवारांनी चर्चा केली. पवारांनी विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस मागितले आहेत. त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT