sharad pawar different stand  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर का आले होते? भेटीबद्दल शरद पवारांचा खुलासा

उद्धव ठाकरेंच्या भेटीत कशावर झाली चर्चा झाली याबाबतही शरद पवारांनी माहिती दिली

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाविकास आघाडी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली आहेत. या भेटीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते.

दरम्यान अचानक झालेल्या भेटीमुळे राजकारणात काही घडणार का अशा चर्चा पाहिला मिळाल्या मात्र भेटी मागील कारण समजू शकलं नव्हतं. यासंबधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार बोलताना म्हणाले की, आज महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी एका विचाराने चालावं, काम करावं अशी या भेटीमध्ये चर्चा झाली असं शरद पवार म्हणालेत.

तर काल झालेल्या या भेतीबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, या बैठकीमध्ये राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. भविष्यातील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली, शरद पवार देशाचे जेष्ठ नेते आहेत. या बैठकीत सुप्रिया सुळे देखील होत्या, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान राऊतांच्या या माहितीमुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची मुठ बाधण्यासाठी आता उद्धव ठाकरे देखील पुढाकार घेणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी नंतर भाजपमध्ये घडामोडींना वेग आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही भाजप नेत्यानी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. या संपूर्ण घडामोडीसह राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा चंद्रशेखर बावणकुळे आणि आशिष शेलार यांनी अमित शाह यांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT