Sharad Pawar On ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: कुणाला काही व्यक्तिगत निर्णय...भाजपसोबत जाण्या संदर्भात पवारांचं मोठं विधान

विरोधीपक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असी जोरदार चर्चा रंगली आहे.

धनश्री ओतारी

गेल्या काही दिवासांपासून विरोधीपक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असी जोरदार चर्चा रंगली आह. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राज्यतील राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. (Sharad Pawar said on the discussion of Ajit Pawar going with BJP )

काही दिवासांपूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतदेखील शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेले होते. त्यावेळी चर्चेदरम्यान अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शरद पवार काय म्हणाले? याचा खुलासा राऊत यांनी सामना रोखठोकमध्ये केला आहे.

What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सिल्वर ओकवर नेमकी काय झाली चर्चा?

मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही.

महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले.

तसेच, ईडीच्या दहशतीवरही पवारांनी यावर मत मांडले असल्याचे रोखठोकमध्ये राऊतांनी म्हटलं आहे. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, ”आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत!”

जित पवार ३५-४० आमदारांसह भाजपासोबत सत्तास्थापनासाठी सज्ज चर्चेला उधाण

अजित पवार नाराज आहे, नॉटरिचेबल आहेत, अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता याच चर्चांमध्ये भर म्हणून अजित पवार सत्तास्थापनेसाठी तयार असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ३५-४० आमदारही असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Gold Rate Today : सोन्यात अभुतपूर्व तेजी, दिवाळीत १.५ लाखांवर पोहोचणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'

Cough Syrup: नागपूरमध्ये कफ सिरपमुळे ६ मुले व्हेंटिलेटवर

SCROLL FOR NEXT